जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या स्वरूपाचा प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेला गूढार्थ आपण पाहात आहोत. श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे, षड्दर्शनांचे प्रतीक आहेत. कपिलमुनींचे सांख्य, कणादांचे वैशेषिक, पतंजलींचे योग, न्याय, मीमांसा व वेदान्त ही सहा दर्शने अथवा शास्त्रे आहेत. साक्षात् परब्रह्म भगवान श्रीदत्तप्रभू हे जगद्गुरु असल्याने ही सर्व शास्त्रे जणू त्यांच्या पावन देहाचे अवयवच आहेत.
या सहा हातांपैकी, उजवीकडील तीन हात हे भक्तांसाठी अाहेत. उजवी बाजू आपल्याकडे पवित्र मानली जाते. तसे भक्तांना देवांकडे प्रथम मान आहे, म्हणून त्यांना उजवी बाजू दिलेली आहे. तर डावीकडील तीन हात हे अभक्तांसाठी, दुष्टांसााठी आहेत. या तिन्ही हातांतील शस्त्रे ही दुष्टांना शासन करण्यासाठी आहेत. यांचे रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे तीन हात अभक्तांसाठी, दुष्टांसाठी आहेत. कमंडलू - पाणी मारून वैरी नाशासाठी, त्रिशूळ - दूर असलेल्या शत्रूला मारण्यासाठी, चक्र - फारच दूरच्या दुष्ट शक्तींना मारण्यासाठी.
श्रीदत्तप्रभूंनी डावीकडील सर्वात खालच्या हातात ब्रह्मदेवांचे 'कमंडलू' हे आयुध धारण केलेले आहे. यातील पाणी मारून ते धर्माचे व सज्जनांचे तसेच भक्तांचे वैर करणारे, त्यांना अकारण त्रास देणारे शत्रू मारून टाकतात. मधल्या हातात त्यांनी भगवान शिवांचे 'त्रिशूल' हे आयुध धारण केलेले आहे. हे त्रिशूल फेकून दूरचे शत्रू ते नष्ट करतात. सर्वात वरच्या हातात त्यांनी भगवान श्रीविष्णूंचे 'चक्र' हे आयुध धारण केलेले आहे. फारच दूरच्या दुष्ट शक्तींचा नि:पात करण्यासाठी त्या चक्राचा ते उपयोग करतात.
भगवान श्रीदत्तप्रभू हे भक्तवत्सल भक्ताभिमानी व दुष्टनिर्दालन करणारे आहेत. त्यांच्या या ब्रीदांचे द्योतक असणा-या त्यांच्या सहा हातांचा व त्यांतील आयुधांचा हा विलक्षण गूढार्थ, आजवर पहिल्यांदा प.पू.श्री.मामांनीच सर्वांना समजेल असा शब्दांमध्ये प्रकट केलेला आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
12 December 2016
॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सव !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
December
(31)
- ॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१३ डिसेंबर २०१६भगवान श्रीदत्तात्रेय जयं...
- ॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥१० डिसेंबर २०१६ - श्रीगीता जयंती
- ॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१ डिसेंबर २०१६
-
▼
December
(31)
0 comments:
Post a Comment