6 December 2016

॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज हे अध्यात्मातील फार थोर अनुभवी महात्मे होते. ते आपला स्वानुभव खूप नेमकेपणे तसेच मूलगामी आणि सुंदर शब्दांमध्ये सांगत असत. त्यांच्या त्या विलक्षण हातोटीला तोडच नाही !
मनाचे सतत चालणारे संकल्प-विकल्प म्हणजेच आपल्या वासना या दाबून उपयोग नसतो. दाबलेल्या वासना या संधी मिळताच अधिक जोरात उफाळून बाहेर येतात. यासाठी पू. मामा सांगतात की, " मनाचे संकल्प विकल्प किंवा वासना या दाबून म्हणजे पुरून उपयोग होत नाही, त्या जाळूनच टाकाव्या लागतात. हे केवळ श्रीगुरुकृपेनेच शक्य होते. " हे नीट समजावे म्हणून ते एक छान उदाहरण देतात.
दोन सामान्य माणसे होती. ती मेल्यानंतर एकाच्या मुलाने त्याला जाळून टाकले व दुस-याला पुरून टाकले. ज्याने जाळून टाकले त्याला पुन्हा त्या जागेवर जाण्याचे कारण पडले नाही. परंतु ज्याने पुरले होते, त्यास तेथे जाताच बापाची आठवण होणे स्वाभाविक होते. तसेच वासनांचे असते. त्या दाबल्या म्हणजेच पुरून टाकल्या तर पुन्हा कधीतरी आठवणारच. पण त्याच जेव्हा जाळल्या जातात तेव्हा मात्र मुळातून नष्ट होतात. आणि ही वासना जाळण्याची प्रक्रिया केवळ श्रीगुरुकृपेनेच होते ! श्रीगुरूंनी दिलेली साधना हाच त्यासाठी एकमात्र मार्ग आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates