जगद्गुरु भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंचा जन्मोत्सव जवळ आलेला आहे. त्यानिमित्त, आजपासून तीन दिवस प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी सांगितलेली भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अलौकिक स्वरूपाची काही विलक्षण वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत.
श्रीदत्तप्रभू हे भगवान ब्रह्मा, विष्णू व महेशांचे एकत्रित स्वरूप आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तिघांची प्रत्येकी दोन आयुधे मिळून सहा आयुधे आहेत. त्यांच्या हातांचे व त्यातील शस्त्रांचे मार्मिक रहस्य सांगताना प.पू.श्री.मामा म्हणतात, " भगवान श्रीदत्तात्रेयांचे सहा हात हे सहा शास्त्रांचे निदर्शक आहेत. त्यांपैकी तीन हात भक्तांसाठी आहेत. हातातील माळ - जपासाठी, डमरू - व्याकरण आदी शास्त्रे शिकवण्यासाठी, शंख - ज्ञान देण्यासाठी. "
भगवान श्रीदत्तप्रभूंचे सहा हात हे सहा शास्त्रांचे द्योतक आहेत. श्रीदत्तप्रभूंचे तीन हात भक्तांसाठी आहेत तर तीन हात अभक्तांसाठी, शत्रूंसाठी आहेत. भक्तांसाठी असलेल्या उजवीकडील तीन हातांपैकी, सर्वात खालच्या हातात त्यांनी ब्रह्मदेवांचे आयुध असणारी जपाची 'माळ' धारण केलेली आहे. आपल्या भक्तांना सतत नामस्मरण करण्याचा त्याद्वारे श्रीदत्तप्रभू बोध करतात.
मधल्या हातात 'डमरू' हे शिवांचे आयुध आहे. त्याचा वापर व्याकरणादी शास्त्रे शिकवण्यासाठी होतो. व्याकरण शास्त्राची मूळ सूत्रे भगवान शिवांनी डमरूच्या नादातूनच निर्माण केलेली आहेत.
सर्वात वरच्या हातात भगवान विष्णूंचे 'शंख' हे आयुध आहे. या शंखाच्या स्पर्शाने भगवंत शिष्यांना ज्ञानदान करतात. ध्रुवबाळाच्या गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श करून श्रीभगवंतांनी ज्ञान दिल्याचा उल्लेख भागवतात व श्रीज्ञानेश्वरीत आहे.
या तिन्ही हातांचा व त्यातील आयुधांचा, जगद्गुरु भगवान श्रीदत्तप्रभू आपल्या शरणागत शिष्यांवर कृपाप्रसाद करण्यासाठीच उपयोग करतात. हे अद्भुत रहस्य आजवर पहिल्यांदाच प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी प्रकट केलेले आहे, तेच श्रीदत्तजयंती पर्वाच्या निमित्ताने आपण सप्रेम अभ्यासूया !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 December 2016
॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सव !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
December
(31)
- ॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१३ डिसेंबर २०१६भगवान श्रीदत्तात्रेय जयं...
- ॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥१० डिसेंबर २०१६ - श्रीगीता जयंती
- ॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१ डिसेंबर २०१६
-
▼
December
(31)
0 comments:
Post a Comment