14 December 2016

॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६

रंजकतेने परमार्थ सांगणे, हसत खेळत बोध करणे, ही प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांची खासियतच होती. उगीचच विद्वत्तापूर्ण शब्दांत, कठीण पद्धतीने बोललेले त्यांना अजिबात अावडत नसे. ते आपल्या नर्म विनोदी शैलीतून, समोरच्या माणसांना आपलेपणा वाटेल अशा सुरेख पद्धतीनेच प्रवचनसेवा करीत असत. प.पू.मामांच्या निखळ शैलीचा हा नमुना पाहा किती गोड आहे ते !
कीर्तनाला, प्रवचनाला गेलो की आपल्याला हमखास झोप येतेच. हा सामान्यपणे सगळ्यांचाच अनुभव आहे. या हटकून येणा-या झोपेचे गमतीशीर कारण सांगताना प.पू.मामा म्हणतात, " कुंभकर्ण मेला. त्याची पतिव्रता स्त्री कोण? तर झोप!  तो गेल्यावर तिने कुठे जायचे? श्रीरामांनी तिला वर दिला की; " तू प्रवचनास, कीर्तनास जा! " म्हणून कीर्तनात व प्रवचनात झोप येते. "
कुंभकर्ण सहा महिने झोपत असे. त्यामुळे झोप ही जणू त्याची पतिव्रता स्त्रीच होती. त्याला जेव्हा श्रीरामरायांनी मारले तेव्हा ती झोप त्यांच्याकडे आली व त्यांना म्हणाली, " देवा, आता मी कुठे जावे? काय करावे?" त्यावर त्यांनी सांगितले, " अगं, सगळ्या बायका करतात ते कर. तू कीर्तनाला, प्रवचनाला जात जा." तिने अगदी मनापासून ते पाळले. पण ती तिथे यायला लागल्यामुळे लोकांची पंचाईत झाली. कीर्तनकारासमोरचे श्रोते कधी त्या झोपेच्या अधीन होतात ते कोणालाच कळत नाही. श्रीसंत नामदेवराय देखील म्हणतातच की, " कीर्तनी बैसता निद्रे नागविले । "
साधीशी गोष्ट, पण पू.मामांनी किती रंजक पद्धतीने सांगितली आहे ना! अशा पद्धतीने परमार्थ सांगितला तरच आपल्यासारख्या सामान्यांना तो हळूहळू अंगवळणी पडतो; आणि या किमयेत संत निष्णातच असतात !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates