शरीराच्या सुख-दु:खांची जाणीव त्या शरीराशी एकरूप झालेल्या 'मी' मुळे होते, पण मी म्हणजे काही शरीर नव्हे. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, " 'मी' शरीराहून अलग आहे. मी हा घराचा मालक आहे; पण मी घर नव्हे. "
शरीर माझे आहे, असे आपण म्हणतो; शरीरच मी आहे असे म्हणत नाही. मी शरीरात राहून शरीराला चालवत असतो. मी मोटारीचा मालक आहे, मी म्हणजे मोटार नव्हे.
कालचेच उदाहरण पाहा. पाय माझा होता तो कापला, पण म्हणून मी मेलो नाही. पायाहून मी वेगळा आहे. आपल्या शरीराशी आपण इतके एकरूप झालेलो असतो की, ते शरीर आपल्याहून वेगळे समजतच नाही. आपण त्या शरीराहून वेगळे आहोत, हे केव्हा कळेल? तर सद्गुरु भेटतील तेव्हा ! हे वेगळेपण पूर्ण कळल्याशिवाय अलिप्तपणाही येणार नाही आणि सुख-दु:खांकडे त्रयस्थपणे पाहताही येणार नाही.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment