भक्तश्रेष्ठ अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जे तत्त्वज्ञान प्रकट केले त्याला भगवद् गीता म्हणतात. हा आपल्या संस्कृतीचा प्रमुख ग्रंथ आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, मोक्षदा एकादशी ही श्रीगीता जयंती म्हणून साजरी होते.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या पावन ग्रंथाचे वैशिष्ट्य सांगताना म्हणतात, " अर्जुनाच्या मोहाचे निमित्त करून श्रीभगवंतांनी सांगितलेले गीताशास्त्र हे व्यापक अर्थाचे एक योगशास्त्रच आहे. त्या गीतार्थाचे सार असणारे योगविभवभांडार श्री माउलींनी सर्वार्थाने प्रकट केलेले आहे. "
पू.मामा सांगतात की, गीता हे व्यापक अर्थाने योगशास्त्रच आहे, म्हणून श्रीगीतेच्या अध्यायांना सांख्ययोग, भक्तियोग अशीच नावे दिलेली आहेत. या योगरूपी वैभवाचे सार सांगण्यासाठी, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने श्रीभगवंतच परत अवतरले व ते गीतारूप तत्त्वज्ञान त्यांनी सर्व बाजूंनी, समग्रपणे पुन्हा कथन केले. श्रीभगवंतांचे हृद्गत श्री माउलीच सांगतात. श्रीभगव्तांच्या वाङ्मयी श्रीमूर्तीला जयंतीनिमित्त सादर दंडवत प्रणाम !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment