भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ ही अत्यंत अलौकिक रचना आहे. हरिपाठ हा श्रीगुरुकृपेचे अद्भुत लेणेच आहे. साधकांसाठी तर तो प्रत्यक्ष अकल्पनाख्य कल्पतरूच आहे ! हरिपाठातून माउलींनी त्यांच्या समग्र वाङ्मयाचे सार कथन केलेले आहे. पण त्यामुळेच तो सोपा राहिलेला नाही. श्री माउलींना अभिप्रेत असणारे हरिपाठाचे मर्म समजण्यासाठी काय आवश्यक असते? हे सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " हरिपाठाचे पठण सर्वच करतात; परंतु त्याचे अनुसंधान सर्वांनाच जमते असे नाही. त्यासाठी आंतरिक अभ्यासाची व सद्गुरुकृपेची जरुरी असते. "
हरिपाठाचे प्रेमाने नियमित पठण करणे ही देखील एक प्रकारची उपासना आहे. त्याचेही फळ मोठेच आहे. पण माउलींनी हरिपाठातून जे गुरुगम्य रहस्य सांगून ठेवलेले आहे, त्याचा सखोल अभ्यास व त्यानंतर त्यातील तत्त्वाचे अनुसंधान घडले तरच खरा लाभ होईल. पण हे अनुसंधान स्वप्रयत्नाने घडत नाही. त्यासाठीही श्रीगुरुकृपेची आवश्यकता असते.
पुष्कळ वाचून किंवा कोणाकोणाचे ऐकून लोक हरिपाठाचा अर्थ करतात खरा, परंतु त्यातून मर्माचे आकलन होताना काही दिसत नाही. हरिपाठाच्या शब्दार्थापेक्षाही त्याच्या लक्ष्यार्थाचा विचार होणे फार महत्त्वाचे आहे. तसे पाहिले तर, हरिपाठाच्या लौकिक अभ्यासासाठी देखील आंतरिक तयारी व श्रीगुरुकृपा ही हवीच. 'श्रीगुरुकृपा' हेच हरिपाठाचे एका शब्दात व्यक्त होणारे सार आहे. म्हणून त्यातील तत्त्वाचे अनुसंधान होऊन दिव्य अनुभूती लाभावी असे ज्याला मनापासून वाटते, त्याने आधी आपल्या श्रीगुरूंना शरण जाऊन त्यांची कृपा संपादन केलीच पाहिजे !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
20 December 2016
॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
December
(31)
- ॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१३ डिसेंबर २०१६भगवान श्रीदत्तात्रेय जयं...
- ॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥१० डिसेंबर २०१६ - श्रीगीता जयंती
- ॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१ डिसेंबर २०१६
-
▼
December
(31)
0 comments:
Post a Comment