प्रपंच बाधक नसतो, त्या प्रपंचाची आसक्ती बाधक असते. आपण जेवढे त्यात गुंततो तेवढा तो जास्त त्रासदायक ठरतो. सर्वसामान्य मनुष्य व संतांमध्ये हाच तर महत्त्वाचा फरक असतो की, संत त्या प्रपंचातही अलिप्त राहतात, त्या प्रपंचात कमळाच्या पानासारखे संगरहित होऊन वावरतात. आणि आपण मात्र दलदलीत फसलेल्या माणसाप्रमाणे आपल्याच कर्मांनी त्या प्रपंचात अधिकाधिक गुंतत जातो.
संतांचे वेगळेपण सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " साधुसंत प्रपंचाला भीत नाहीत; कारण ते असंग, अलिप्त असतात. " साधुसंत प्रपंचात राहूनही त्यात नसल्यासारखेच असतात, म्हणून ते त्याला अजिबात भीत नाहीत. याच्या उलट आपण कायमच कसल्या ना कसल्या भीतीखाली वावरत असतो; कारण आपण त्या प्रपंचात, म्हणजेच आपल्याच वासनांच्या जाळ्यात पुरते गढलेलो असतो. आपली भीती कायमची जायला हवी असेल, तर आपण स्वकष्टानेच निर्माण केलेले ते जाळे साधनेने व शुभप्रयत्नांनी लवकरात लवकर तोडून टाकले पाहिजे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment