16 December 2016

॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६

आजची जगाची परिस्थिती भयंकर आहे याविषयी कोणालाच शंका नाही. संत क्रांतदर्शी म्हणजे फार पुढच्या काळातील गोष्टी पाहू शकणारे असल्याने, त्यांच्या दृष्टीला न दिसणारे काहीही नसतेच. त्यांच्या पावन दृष्टीला काळाचा बंधच नसतो. म्हणूनच संतांचे सांगणे हे त्रिकालाबाधित सत्य असते.
आजच्या आपल्या सामाजिक परिस्थितीचे अचूक निरीक्षण नोंदवताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " पूर्वी स्वयंपाकघर घरात असायचे आणि पायखाना घरापेक्षा दूर. आजकाल पायखाने घरात आलेले आहेत आणि स्वयंपाकघर बाजारात गेले आहे. "
पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच पू.मामा किती नेमके बोललेले आहेत पाहा ! 'अॅटॅच्ड टॉयलेटबाथ' करण्याच्या भानगडीत आपले किचनच घरातून 'डिटॅच' झाल्याचे आपल्या लक्षातही येत नाहीये. पूर्वी घरात केलेले सात्त्विक संस्कारांचे शुद्ध अन्न खात असल्याने लोकांची मनस्थिती व आरोग्य दोन्हीही उत्तम होते. आता सकाळी बाहेर पडताना माय-बाप व पोरे मोकळे डबे घेऊन बाहेर पडतात व कोप-यावरच्या दुकानातून 'घरगुती' पोळीभाजी विकत घेऊन ऑफिसात व शाळेत जातात. रात्री दमून आल्यावर, एका फोनवर घरपोच झालेले पिझ्झा-पास्टा वगैरे फार गोड लागते नाही ! 'काय करणार, अहो, फारच धावपळीचे झाले आहे ना जग!'....वर हे लटके कारण. पण या तथाकथित  धावपळीच्या जमान्यात, आपली धावपळ आणि खर्च केवळ आरोग्याच्या तक्रारींसाठीच जास्त वाढलेला आहे; हे आपण कधी लक्षात घेणार कोणास ठाऊक?
पू.मामा अगदी खरे बोलत आहेत. पूर्वी संडास घराबाहेर लांब असायचे. आता ते घरात आलेत आणि संपूर्ण आयुष्याचे सुखासमाधानाचे स्थान असणारे स्वयंपाकघर बाजारात गेलेले आहे. बाजारचा माल हा दिखावू आणि टाकावूच असतो, हे हज्जारदा बोलतो आपण, पण उमजून घेत नाही, हे दुर्दैव!
बाजारातून आणलेल्या, शेकडो लोकांच्या नजरा गेलेल्या व करोडो जीवजंतूंनी दूषित केलेल्या अन्नाने भरलेले पोट हे त्या संडासाइतके वाईट आहे, असे निष्णात वैद्य असणारे पू.मामा जणू यातून आपल्याला सुचवत असावेत का? पण; पू.मामांच्या या सांगण्यानुसार वेळीच फार खोलवर जाऊन विचार करण्याची व तत्काळ त्यावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे, एवढे मात्र नक्की !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates