भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ हा वारक-यांची संध्याच आहे. दररोज हरिपाठ म्हटलाच पाहिजे हा संप्रदायाचा दंडक आहे. कित्येक वारकरी हरिपाठ म्हटल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबही घेत नाहीत. अशा या परमपावन व गूढगंभीर हरिपाठावरील प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचे रहस्योद्घाटक भाष्य आपण पाहात आहोत.
श्री माउलींच्या या छोट्याशा प्रकरणग्रंथाला 'हरिपाठ' हेच नाव का बरे दिले असेल? असा प्रश्न एकदा पू.मामांनी आपल्या मातु:श्री पू.पार्वतीदेवींना विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये हरिपाठ या नामाचे रहस्य सांगितले. त्या म्हणाल्या, " 'हरिपाठ' या शब्दातच हरिपाठाची खुबी आहे. आपल्या पाठीच्या मणक्यातून, मेरुदंडातून हरीकडे जाण्याचा एकमेव रस्ता आहे. त्या रस्त्याने गेले असता हरी भेटतो; एरवी नाही. तो मार्ग हाच हरिपाठ होय ! "
पाठ करणे, असा जरी हरिपाठाचा अर्थ प्रचारात असला, तरी 'पाठ' म्हणजे 'मनुष्यमात्राची जी पाठ', तीच पाठ येथे माउलींना अभिप्रेत आहे. या पाठीच्या मणक्यांतून, मेरुदंडातूनच हरीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यालाच सुषुम्ना मार्ग म्हणतात. श्रीगुरूंनी साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत करून दिल्यावर, जीवाला सोबत घेऊन ती याच पाठीच्या मार्गाने सहस्रारचक्रात निवास करणा-या भगवान शिवांना भेटायला जाते व तेथे स्वत:ही शिवरूप होऊन जाते. त्याचवेळी तो जीव सुद्धा आपले भ्रमाने भासणारे जीवपण टाकून पुन्हा मूळच्या शिवस्वरूपाला प्राप्त होतो. या प्रक्रियेचे सर्वांगीण मार्गदर्शन करणारी भगवान श्री माउलींची दिव्य रचना म्हणजेच 'हरिपाठ' होय.
हरिपाठ शब्दाचा हा अचूक अर्थ, प.पू.श्री.मामांनीच सर्वात प्रथम सांगितलेला आहे. या परमअद्भुत हरिपाठातील अशी अनेक रहस्ये पू.मामांनी वेळोवेळी उलगडून दाखविलेली आहेत, ती अापण यथाक्रम पाहणारच आहोत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
18 December 2016
॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
December
(31)
- ॥ अमृतबोध ॥३१ डिसेंबर २०१६॥ हरिपाठ मंजिरी - १५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २७ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ११ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - १० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १९ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - ३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ डिसेंबर २०१६ ॥ हरिपाठ मंजिरी - २ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१३ डिसेंबर २०१६भगवान श्रीदत्तात्रेय जयं...
- ॥ अमृतबोध ॥ १२ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥ ११ डिसेंबर २०१६ भगवान श्रीदत्तात्रेय...
- ॥ अमृतबोध ॥१० डिसेंबर २०१६ - श्रीगीता जयंती
- ॥ अमृतबोध ॥ ९ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥५ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२ डिसेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१ डिसेंबर २०१६
-
▼
December
(31)
0 comments:
Post a Comment