आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन !
भगवान श्री माउली हे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे हृदय अधिष्ठातेच होते. माउली हे मामांचा प्राणच होते. त्यांनी निरंतर माउलींच्या दिव्य सारस्वताचे मनन चिंतन केले. अगदी झोपेतही त्यांचे हे चिंतन अखंड चालत असे. श्री माउलींच्या परमकृपेने प. पू. मामांच्या हृदयात माउलींच्या शांतशीतल कृपाचंद्रम्याची पूर्ण पौर्णिमा बहराला आलेली होती. त्यामुळेच प. पू. श्री. मामा श्री माउलींच्या शब्दांचे आजवर कधीही न ऐकलेले पाहिलेले असे अभिनव अर्थ सांगत असत.
भगवान श्री माउलींच्या पावन सारस्वताचे सार सांगताना, माउलींविषयीच्या अतीव प्रेमादराने प. पू. श्री. मामा म्हणतात, " श्री माउलींनी आपल्या ग्रंथ व अभंगांद्वारे ज्ञानामृताचा प्रचंड सागरच कृपावंत होऊन निर्मिलेला आहे. त्या ज्ञानभांडाराचे साररूप म्हणजे ' श्रीहरिपाठ ' ! "
आज भगवान सद्गुरु श्री माउलींच्या संजीवन समाधी दिनी, त्यांचेच अपर स्वरूप असणा-या, श्रीज्ञानेश्वरी, श्रीअनुभवामृत, श्रीचांगदेव पासष्टी व श्रीहरिपाठादी अभंग स्वरूपातील त्यांच्या दिव्य संजीवक वाङ्मय-श्रीमूर्तीला साष्टांग दंडवत घालून अमृत-कृपेची याचना करूया !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment