प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांना साधनेची अत्यंत आवश्यक सूचना देताना म्हणतात, " साधना ही श्रीगुरूंनी दाखविलेल्या युक्तीनेच करावी लागते. " साधनेच्या प्रांतात या 'युक्ती'ला अतिशय महत्त्व असते. भगवान श्री माउली पण श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात या युक्तीचे गुणगान गातात.
युक्ती कशी असते? हे समजावून सांगण्यासाठी प. पू. श्री. मामा अजून एक उदाहरण देतात. पूर्वी घरोघरी दही घुसळून लोणी काढत असत. ही दही घुसळण्याची प्रक्रिया सोपी नाही, त्यात खूप युक्त्या वापराव्या लागतात. थंडीत ताकात गरम पाणी घालावे लागते तर उन्हाळ्यात गार पाणी. याच्या उलट केले की लोणी निघतच नाही. आलेले लोणी हळूहळू एकत्र करून ठेवावे लागते, नाहीतर ते विरते. तसेच साधनेच्याही बाबतीत असते. साधनेची युक्ती श्रीगुरूंकडून नीट समजून घेतली व त्यानुसार साधना केली, तरच आपण परमार्थात पुढे जातो. येथेच सगुण रूपातील श्रीगुरूंची आवश्यकताही योग्य पद्धतीने अधोरेखित होते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment