सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात एक महत्त्वाचा चरण घालतात; *"गुजेवीण हित कोण सांगे ॥"* हा चरण मोठा गमतीदार आहे. एक कथा सांगून प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचे सुंदर विवरण करतात.
एक गृहस्थ कोणीतरी सांगितल्यावरून आपल्या मुलाला घेऊन एका श्रीगुरूंकडे आला. तो मुलगा एका खुनाच्या कटात सापडलेला होता. त्यातून सुटण्यासाठी त्या गुरूंनी त्याला उपाय सांगून तप करायला सांगितले. पण तो मुलगा काही साधन करीत नसे व पुन्हा जुन्या संगतीने वागू लागला. बापाशी खोटे बोलून त्या गुरूंची निंदाही करू लागला. पुढे बापही पोराचे म्हणणे ऐकून गुरूंशी प्रतारणा करू लागला.
आता पाहा, यात त्या श्रीगुरूंचे काय नुकसान होणार? पण तेथे गूज न राहिल्यामुळे, हिताचे मार्गदर्शन झाले नाही; व त्या बापलेकांची पुरती अधोगती झाली. श्रीगुरूंजवळ राहूनही त्यांना काहीही प्राप्त झाले नाही. कारण श्री माउली म्हणतात तसे, तेथे गूज नव्हते. गूज म्हणजे प्रेमाचा जिव्हाळा. तो असल्याशिवाय कधीही कोणीही कोणाच्या हिताचे सांगत नसते.
याउलट, जर श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागले, तर ते श्रीगुरु शिष्याची सर्वप्रकारे काळजी त्याच्याही नकळत घेतात. पू.मामा यासाठी स्वत:चाच एक सुरेख अनुभवही सांगतात, तो उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
28 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *२८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ७४ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती ! ...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
February
(28)
- *॥ अमृतबोध ॥* *२८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥२१ फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ६७ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२० फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥१५ फेब्रुवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ६१॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *११ फेब्रुवारी २०१७* *॥ श्रीगुरुप्...
- ॥ अमृतबोध ॥ १० फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *१ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
-
▼
February
(28)
0 comments:
Post a Comment