सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठातून भक्तीचे श्रेष्ठत्वच प्रतिपादित करतात. त्यावर प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी अप्रतिम भाष्य केलेले आहे. ते म्हणतात की, "भक्ती हा केवळ शब्द नसून ती एक अवस्था आहे ! ती अवस्था निव्वळ प्रेमानेच प्राप्त होते. श्रीभगवंतांवर प्रेम करण्यापूर्वी, ते कुठे आहेत हे कळायला पाहिजे. ते तर सर्वांच्या हृदयमंदिरी आहेत, असे श्रीगीता सांगते. म्हणजे आपला त्या ठिकाणी प्रवेश व्हायला पाहिजे. मग त्यासाठीच अंत:करणशुद्धी आली. याचा अर्थ 'योगरहस्या'चा अवलंब करायलाच हवा. म्हणूनच भक्तीला योगशक्ती असेही म्हणतात.
माउली म्हणतात की, "सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कोण्या गुणें ॥४.३॥" प्रत्येक प्राणिमात्र, प्रपंचात कितीही कष्ट पडले तरी प्रेमाने तो करतातच. म्हणजे ते प्रपंचासाठी काही ना काही त्याग करतात. मग जर आपण कष्टपूर्वक प्रपंचात त्याग करतो, तर भक्तीत विनाकष्ट त्याग घडत असेल तर ती का बरे प्रेमाने करीत नाही? ती भक्ती प्रेमाने न करणे हेच आपले मोठे दुर्दैव नाही काय?"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment