हरिपाठाच्या तिस-या अभंगाच्या शेवटच्या चरणात श्री माउली ' ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ' असा शब्दप्रयोग करतात. त्यासंदर्भात प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज त्यांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवींनी सांगितलेला *'रामकृष्ण हरि'* या नामाचा खरा गूढार्थ स्पष्ट करून सांगतात. आजवर याचा असा विलक्षण अर्थ इतरत्र कुठेही व कोणीही केलेला माझ्यातरी पाहण्यात नाही.
पू.मामा सांगतात, *" या _' रामकृष्ण हरि '_ मधील _' राम '_ हा शब्द ब्रह्मवाचक आहे. त्याचा अनुभव कसा घ्यावा? तर _' कृष्ण '_ या शक्तीच्या साहाय्याने. म्हणजे, श्रीसद्गुरुकृपेने शक्ती जागृत झाल्यावर _' राम '_ हा शब्द उच्चारल्यास, त्या _' कृष्ण '_ म्हणजे वक्र, सरळ न जाणा-या, विजेप्रमाणे असणा-या शक्तीच्या साहाय्याने जीव वर जातो व त्यायोगे जीव-शिवांची भेट झाली की जगताच्या आभासाचे हरण केले जाते; म्हणजेच _' हरि '_ !"*
'रामकृष्ण हरि' नामाचा हा पूर्वी कुठेही न वाचलेला, सुंदर, स्वानुभूत व चिंतनीय अर्थ, कायम मनात गोंदवून ठेवावा, त्यावर वारंवार विचार करावा, इतका महत्त्वपूर्ण आहे ! सद्गुरु श्री माउलीना बहुदा येथे राम आणि कृष्णांना असेच मनात, चिंतनात ठेवणे अभिप्रेत असावे.
प.पू.श्री.मामा सद्गुरुमुखातून झालेल्या अलौकिक अशा शक्तियुक्त नामदीक्षेचे अद्भुत माहात्म्यच यातून आपल्याला सांगत अाहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
5 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५१ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
February
(28)
- *॥ अमृतबोध ॥* *२८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥२१ फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ६७ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२० फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥१५ फेब्रुवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ६१॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *११ फेब्रुवारी २०१७* *॥ श्रीगुरुप्...
- ॥ अमृतबोध ॥ १० फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *१ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
-
▼
February
(28)
0 comments:
Post a Comment