हरिपाठाच्या पाचव्या अभंगात सद्गुरु श्री माउली, *"योगयाग विधि येणें नोहे सिद्धि ।"* असे म्हणतात. यातील योग व याग या दोन्ही महत्त्वपूर्ण संज्ञांचे अत्यंत मौलिक व मूलभूत विवेचन प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज करतात. ते खरोखरीच आपण नीट समजून घ्यायला हवे.
पू.मामा म्हणतात, "वेदांमध्ये कांडत्रयी असल्यामुळे, कर्मकांडाचा भाग हा यागावर अवलंबून आहे, तर उपासनाकांडाचा भाग हा योगावर अवलंबून आहे. कर्माने बाह्य मळ तर उपासनेने अंत:करणाचा मळ धुऊन जातो. खरा देव ओळखायचा असेल तर अंत:करण शुद्धच पाहिजे.
'योग' हा चित्तवृत्तींचा निरोध करणारा, वृत्ती शुद्ध करणारा आहे. म्हणून कोणत्याही कर्मकांडाचा श्रीगणेशा हा योगानेच होतो. 'याग' शब्दाने साध्या वैश्वदेवापासून राजसूय, अश्वमेधादी यज्ञांचा निर्देश होतो. पण योग व यागाचा विधी जर नीट माहीत नसेल तर ते काहीही सिद्धीस जात नाही, असे माउली स्पष्ट सांगतात. इतकेच नाही, तर 'मी शास्त्र मानीत नाही, मला वाटते तेच बरोबर', असे म्हणणा-यांचा योग व याग आग्रहाने झाला, तरी तो फक्त दंभालाच कारण होतो. शिवाय त्या दंभामुळे नरकाची प्राप्ती होते. म्हणून या दोन्हीचा योग्य विधी जाणून घेणे फार महत्त्वाचे असते. हे दोन्ही विधिपुरस्सर केले गेले, तरच त्याचा ईश्वरप्राप्तीकडे उपयोग होतो, अन्यथा नाही."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment