4 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ५० ॥*

सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हरिपाठाच्या या तिस-या अभंगाचा सारांश सांगतात की, *ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनि पुण्य होय ॥३.४॥* "माझे सद्गुरु श्री निवृत्तिनाथ महाराज मला आपल्या कृपेने व रामकृष्णांच्या ध्यानाने मनापलीकडे घेऊन गेले. माझे अनंत जन्मांमधले पुण्यच त्यारूपाने आज फळाला आले !"
सद्गुरु श्री माउलींनी इतरही अनेक अभंगांमध्ये हेच सांगितलेले आहे. *बहुता सुकृतांची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥* "माझ्या अनेक जन्मांमधील पुण्याईचा उदय झाला व त्यामुळे मला 'विठ्ठलीं' म्हणजे विठ्ठलांच्या शक्तीबद्दल आवड, प्रेम निर्माण झाले. ही शक्ती म्हणजेच सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथ महाराजांकडून परंपरेने आलेली कृपा होय. या कृपेच्या माध्यमातूनच बोलाबुद्धीच्या पलीकडचे तत्त्व मी साक्षात् अनुभवले", असे श्री माउली अतीव कृतज्ञतेने सांगतात.
प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज या चरणाचे सार मार्मिक शब्दांत सांगतात की, "अनंत जन्मांत हा जीवात्मा पुण्य करीत आला, तरच त्यास श्रीगुरुकृपेचा लाभ होतो व शक्तीच्या ठायी प्रेम निर्माण होऊन साधना करायची सुबुद्धी होते. मग शेवटी जीव-शिवांचे मीलन होऊन तो कृतकृत्य होतो." म्हणून ते आवश्यक पुण्य मिळवण्यासाठीच, इतर अनेक गोष्टी करीत असतानाही सतत 'हरि मुखे म्हणा' असे श्री माउली आपल्याला आवर्जून सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates