17 February 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६३ ॥*

श्रीसंत एकनाथ महाराज भक्तीविषयी म्हणतात, *"भक्ती म्हणजे सोहंशक्ती । सांडी भवभय आसक्ती । पाहता निजभाव विरक्ती । सर्वांभूती भगवंत ॥"* म्हणून नुसती शक्ती म्हणण्यापेक्षा भक्ती म्हणण्यात गर्भितार्थ आहे.
श्रीसंत तुकाराम महाराजही श्रीभगवंतांना विनवणी करताना म्हणतात की, *"तुमचिये दासीचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥"* याचे विवरण करताना प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, 'दासीचा दास' म्हणजे श्रीगुरूंकडून प्राप्त झालेल्या शक्तीचा दास. त्या शक्तीचे दास्यत्व प्रेमाने केले; तरच अंत:करणाची शुद्धी होते. आणि मग त्या शुद्ध अंत:करणात आलेले ज्ञानही टिकाऊ असते. यासाठीच, हरिपाठाच्या चौथ्या अभंगातून सद्गुरु श्री माउली आपल्याला कळकळीने उपदेश करतात की, हरिजप करून प्रपंचाचे असे धरणे कायमचेच तोडा व सुखी व्हा.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates