सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात शुद्ध भावाचे माहात्म्य सांगतात. या संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी एक सुंदर गोष्ट सांगत असत.
एका बाईने नऊ महिने पोटी भार वाहिल्यामुळे, आपल्या मुलाचे हित व त्याबद्दल भाव तिच्या मनात निर्माण होणे साहजिकच होते. दुसरी एक बाई होती, तिला मूल नव्हते; पण मूल असावे असे वाटत असल्याने तिने हिचे मूल चोरून नेले.
शोध केल्यावर ती बाई सापडली पण दोघी मुलावर हक्क सांगू लागल्या. प्रकरण न्यायालयात गेले. दोघींचे म्हणणे ऐकल्यावर न्यायाधीशांनी युक्ती केली. त्यांनी पट्टेवाल्याला तलवार आणून मुलाचे दोन तुकडे करून दोघींना द्यायला सांगितले.
हे ऐकल्याबरोबर ज्या बाईने नऊ महिने पोटी भार वाहिला होता, तिला दु:ख सहन न होऊन ती म्हणाली, "महाराज, हा मुलगा कोठेही असो, परंतु सुखी असो. तुम्ही कृपा करून त्याचे तुकडे करू नका." हे ऐकताच त्या दुस-या भाव नसलेल्या बाईला, आता आपल्याला मूल मिळणार याचा आनंद झाला. पण न्यायाधीशांनी खरी आई ओळखून ते मूल भाव असलेल्या बाईला देऊन टाकले.
खरा विशुद्ध भाव असा बाहेरून आणता येत नाही, तो आतूनच यावा लागतो; व तो आल्याशिवाय देवांची नि:संदेह प्राप्ती होत नसते.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
23 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६९ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
February
(28)
- *॥ अमृतबोध ॥* *२८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥२१ फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ६७ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२० फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥१५ फेब्रुवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ६१॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *११ फेब्रुवारी २०१७* *॥ श्रीगुरुप्...
- ॥ अमृतबोध ॥ १० फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *१ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
-
▼
February
(28)
0 comments:
Post a Comment