Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

30 November 2016

॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६

॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६ साधना सातत्याने जो करतो तोच साधक होय. साधना नुसती मिळून चालत नाही, त्याची पण काही आवश्यक अंगे असतात, ती नीट पाळली गेली तरच साधना पूर्णत्वास जाते. याविषयी फारच सुंदर शब्दांमध्ये मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " नुसते नोकरी लागून चालत...
Read More

29 November 2016

॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६

॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६ सत्य एक असताना दुसरे खोटेच काहीतरी सत्य म्हणून समोर ठेवणे म्हणजे दंभ होय. हा अनेक प्रकारांनी आपल्या सतत समोर येतच असतो. कधी कधी आपणही दंभाने वागतो तर कधी समोरचा वागत असतो.या दंभाचा एक आयाम सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " दंभ या दोषाने अनेकांचे...
Read More

28 November 2016

॥ अमृतबोध ॥ २८ नोव्हेंबर २०१६

श्रीभगवंत अपरंपार दयाळू आहेत यात शंकाच नाही. त्यांच्या अहेतुकदयेला ना अंत ना पार. पण ते दया कोणावर करतात? हे देखील आपण पाहिले पाहिजे. या प्रश्नाचे नेमके व परखड तरीही अतिशय सुंदर उत्तर देताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीहरी दयाळू आहेत; पण जो नुसता वाचाळ, बोलघेवडा आहे त्याला...
Read More

27 November 2016

॥ अमृतबोध ॥२७ नोव्हेंबर २०१६

आज भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी दिन ! भगवान श्री माउली हे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे हृदय अधिष्ठातेच होते. माउली हे मामांचा प्राणच होते. त्यांनी निरंतर माउलींच्या दिव्य सारस्वताचे मनन चिंतन केले. अगदी झोपेतही त्यांचे हे चिंतन अखंड चालत असे. श्री माउलींच्या...
Read More

26 November 2016

॥ अमृतबोध ॥२६ नोव्हेंबर २०१६

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, काचेच्या बरणीत ठेवलेल्या दिव्याचा प्रकाश जसा बाहेर पसरतो, तसे जे अंतरात वसते तेच बाहेर फाकते. आपल्या मनाचे प्रतिबिंब आपल्या वर्तनात दिसून येत असते. आत एक बाहेर एक, हा सर्वच मनुष्यांचा स्वभाव जरी असला, तरीही आपल्या मनातील गोष्टींचे काही ना काही भाग आपल्या...
Read More

25 November 2016

॥ अमृतबोध ॥२५ नोव्हेंबर २०१६

ज्ञान आणि माहिती यात खूप गल्लत केली जाते. संतांना अभिप्रेत असणारे ज्ञान म्हणजे आत्मज्ञानच, आपल्या स्वरूपाचे ज्ञान. आणि आपल्याला शाळा, जुने जाणते लोक, सोशल मिडिया इत्यादी एकूणएक स्तरांवरून मिळणारे ज्ञान हे ज्ञान नसून ती माहिती आहे. ज्ञान हे शिकवून किंवा बाहेरून कधीच येत नसते, ते आतूनच स्वयंभ प्रकट...
Read More

24 November 2016

॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६

साधकाची साधना ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. श्रीगुरूंची कृपा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असली, तरी अजूनही काही गोष्टी असतात. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " साधना ही पूर्वजन्मातल्या तयारीप्रमाणेच, कर्मांप्रमाणेच होत असते. म्हणूनच ती सोडूनही चालणार...
Read More

23 November 2016

॥ अमृतबोध ॥२३ नोव्हेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज साधकांना साधनेची अत्यंत आवश्यक सूचना देताना म्हणतात, " साधना ही श्रीगुरूंनी दाखविलेल्या युक्तीनेच करावी लागते. " साधनेच्या प्रांतात या 'युक्ती'ला अतिशय महत्त्व असते. भगवान श्री माउली पण श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात या युक्तीचे गुणगान गातात. युक्ती...
Read More

22 November 2016

॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६

पूर्वी विहिरीवर रहाट असत. आता ते लोकांना पाहायलाही मिळत नाहीत. या रहाटावरून कळशीने पाणी काढण्याच्या रूपकाचा, प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधनेच्या दृष्टीने सांगितलेला भावार्थ आपण पाहात आहोत. आपल्यापाशी बळ नसेल तर दुस-याचे उसने बळ घेऊन ती कळशी खेचावी लागते. पण तरी देखील किती खेचावी ह्याचे...
Read More

21 November 2016

॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६

प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचे कळशीचे रूपक आपण पाहात आहोत. पाण्याने भरलेल्या कळशीला लावलेला दोर नेटाने ओढून आपण ती वर घ्यायची असते. त्यासंदर्भात पू. मामा म्हणतात की, " विहिरीतून कळशी बाहेर खेचताना आपल्यापाशी पुरेसे बळ नसेल तर दुस-याचे उसने घ्यावे लागते. तसेच श्रीगुरुकृपेचे असते. " परमार्थात...
Read More

20 November 2016

॥ अमृतबोध ॥२० नोव्हेंबर २०१६

अगदी सोप्या, घरगुती उदाहरणांमधून परमार्थाचा उत्तम बोध करण्याची विलक्षण हातोटी ही प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांची खासियत होती. त्यामुळेच त्यांच्या उपदेशाने आपल्या हृदयाचा ठाव घेतला नाही तरच नवल ! पूर्वी विहिरीवर रहाट असायचे. त्याला कळशी लावून पाणी शेंदत असत. त्याचे साधनेच्या संदर्भातील...
Read More

19 November 2016

॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६

' जो दुस-यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला । ' हे वचन सर्वश्रुतच आहे. या मागील मार्मिक सिद्धांत सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " एकाच कार्याबद्दल दोघांचे मत सारखे असणे कठीण; म्हणून दुस-यावर विसंबून कार्य हाती घेण्यात अर्थ नाही. " एकाच गोष्टीबद्दल दोघेजण कधीच सारखे मत...
Read More

18 November 2016

॥ अमृतबोध ॥ १८ नोव्हेंबर २०१६

एखाद्याच्या मनाची आवड हा स्वतंत्र विभागच आहे. मनाला काय आवडेल? हे कोणी सांगू पण शकत नाही. आपापल्या पूर्वकर्मांनुसार ज्याला त्याला जशी तशी बुद्धी होत असते. या मनाच्या आवडीचा भाग सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " एखादे स्तोत्र सतरा वेळा पाठ करूनही पाठ होत नाही; पण शिमग्यातल्या...
Read More

17 November 2016

॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६

सामान्यपणे ज्याला ऐकू येत नाही त्याला बहिरा म्हणतात. पण कानांच्या अकार्यक्षमतेपुरतेच हे बहिरेपण संतांना मात्र मान्य नाही. म्हणूनच संतांना अभिप्रेत असलेले व परमार्थाच्या दृष्टीने पाहिल्यावर जाणवणारे खरे बहिरेपण सांगताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " श्रीभगवंतांविषयी काहीही ऐकले...
Read More

16 November 2016

॥ अमृतबोध ॥ १६ नोव्हेंबर २०१६

पापकर्मांचे तीन प्रकार आपण पाहात आहोत. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज तिसरा प्रकार सांगताना म्हणतात, " उच्चार करून दाखविलेल्या पापाचे मनुष्य प्रत्यक्ष देहाने आचरण करतो. हे तिसरे पापकर्म होय. " मनात निर्माण झालेली पापप्रवृत्ती मुखावाटे बाहेर येते. त्याचेच मग शरीराच्या आधाराने प्रत्यक्ष आचरण...
Read More

15 November 2016

॥ अमृतबोध ॥१५ नोव्हेंबर २०१६

पापकर्म तीन प्रकारचे असते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात. काल आपण पाहिलेले त्यातील पहिले, मानसिक पाप हे कलियुगात गौण मानले जाते. मनातील हीच पापवृत्ती प्रारब्धाने व आपल्या दुर्विचाराने बळावली की तीच त्या मनुष्याच्या मुखावाटे बाहेर पडते. म्हणून प. पू. श्री. मामा सांगतात, " अंत:करणात...
Read More

14 November 2016

॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६

मनुष्याच्या हातून घडणारे प्रत्येक पापकर्म तीन प्रकारचे असते. वाल्मीकी रामायणाचा संदर्भ देऊन प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी ते स्पष्ट करून सांगितलेले आहे. आजपासून तीन दिवस आपण त्या तीन प्रकारांचा परामर्ष घेऊया. प. पू. श्री. मामा पापकर्मांचे रहस्य सांगताना म्हणतात, " पापकर्म तीन प्रकारचे...
Read More

13 November 2016

॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६

श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व आहे. श्रीभगवंतांची अभिन्न कृपाशक्तीच जीवांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर सगुणरूपाने श्रीगुरु म्हणून अवतरते. श्रीगुरुपरंपराही तीच व श्रीगुरूही तीच शक्ती असते. त्यामुळे श्रीभगवंत, त्यांची कृपाशक्ती व श्रीगुरु ही एकाच परब्रह्मतत्त्वाची वेगवेगळी नावे आहेत. त्यांच्यात किंचितही...
Read More

12 November 2016

॥ अमृतबोध ॥ १२ नोव्हेंबर २०१६

श्रीभगवंतांची प्राप्ती करवून देणारे वर्तन म्हणजेच धर्म. जेवढी आपली प्रेमभावना तीव्र तेवढेच ते धर्माचरणही आपल्या हातून अचूक होत जाते. धर्म ही श्रीभगवंतांची आज्ञा आहे, म्हणून ती आपल्या सर्वांसाठी निरंतर अनुसरणीयच ठरते. संतांना अभिप्रेत असलेल्या विशुद्ध धर्माचे मूलतत्त्व आपण कालच्या अमृतबोधातून समजून...
Read More

11 November 2016

॥ अमृतबोध ॥ ११ नोव्हेंबर २०१६

प्रबोधिनी कार्तिकी एकादशी !! धर्माची गती गहन आहे असे म्हणतात. विशुद्ध धर्माची तत्त्वे समजून घेणे व त्यानुसार आचरण करणे हेही त्यामुळे खूप कठीण मानले जाते. धर्मपालनाच्या बाबतीत नेहमीच संतांनी सांगितलेल्यानुसार आचरण करणे, हे आपल्यासाठी सोयीचे व सुलभ असते. संतांना अभिप्रेत असणा-या परमविशुद्ध व मुख्य...
Read More

10 November 2016

॥ अमृतबोध ॥१० नोव्हेंबर २०१६

प्रपंच आणि परमार्थ हे आपल्या खूप सवयीचे शब्द आहेत. प्रपंच म्हणजे मायेची सृष्टी, जे जे दिसते ते सर्व. भगवान श्री माउली स्पष्ट सांगतात की, " मनोमार्गे गेला तो येथेचि मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ " मनाचा मार्ग म्हणजे प्रपंच तर हरीचा मार्ग म्हणजे परमार्थ. हे परस्परविरोधी मार्ग आहेत. प्रपंचात...
Read More

9 November 2016

॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६

प्रपंच सोडून राम राम म्हणा असे संत कधीच सांगत नाहीत. प्रपंचाचाच परमार्थ करण्याची खुबी मात्र ते आवर्जून शिकवतात. आजच्या अमृतबोधातून असेच सोपे पण महत्त्वाचे मार्गदर्शन करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, " सहलीला जावे की भक्तियात्रेला ? तर भक्तियात्रेलाच जावे. यात्रेत सहल होतेच; पण...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates