Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

31 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३१ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६४ ॥*

भगवान श्रीविष्णूंचे पावन धाम असलेल्या वैकुंठाची प्राप्ती होणे हे अतिशय दुर्मिळ मानले जाते. पण या महात्म्यांची गोष्ट वेगळी असते. ते अवघ्या जगालाच वैकुंठमय करून सोडतात. श्रीभगवंतांच्या अलौकिक नामस्मरणाच्या प्रभावाने ते जगाचेच वैकुंठ करतात. हे सामर्थ्य केवळ महात्म्यांचेच आहे, असे सद्गुरु श्री माउली...
Read More

30 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *३० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६३ ॥*

महात्म्यांचा आणखी एक थोर सद्गुण सद्गुरु श्री माउली सांगतात की, त्यांना कसलाही आपपर भावच नसतो. राजा असो किंवा रंक, त्यांच्या दृष्टीने दोघेही समानच असतात. शिवाय लहान-थोर असाही भेद त्यांच्या ठायी नसतो. ते सरसकट सर्वांना आपल्या आनंदाने वेष्टून टाकतात." संतांच्या ठायी श्रीभगवंतांचा परमानंद परिपूर्ण भरलेला...
Read More

29 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६२ ॥*

महात्म्यांचा अद्भुत अधिकार सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात की, "ते स्वर्गीय अमृतप्राशनावाचून अमर करतात; आणि योगाभ्यासावाचून मोक्षसुखाचा लाभ करून देतात !" स्वर्गातील अमृत प्यायले की काही काळासाठी अमरत्व प्राप्त होते. पण संतांची अमोघ कृपा झाली की ते अमृत न पिताच, कधीही लोप न पावणारे शाश्वत अमरत्व...
Read More

28 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२८ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६१ ॥*

जगामध्ये रात्र संपून पहाट झाल्यावरच उजाडते. त्याशिवाय अंधकार जाऊन उजेड पडत नसतो. पण संतांचे, महात्म्यांचे असे नसते. ते लौकिक पहाट न  होताच ज्ञानाच उजेड सर्वांच्या अंत:करणात पाडतात; असे महात्म्यांचे अद्भुत सामर्थ्य सद्गुरु श्री माउली सांगतात. आत्मज्ञानाचा प्रकाश हा स्वतंत्रच असतो. तो पडल्यावर...
Read More

27 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६० ॥*

महात्म्यांची करुणा फार विलक्षण असते. त्या स्वाभाविक करुणेने ते आपल्या सभोवतीच्या दु:खी-कष्टी जीवांचेही भले करतात. सद्गुरु श्री माउली सांगतात की, महात्मे श्रीभगवंतांच्या नामघोषाने सर्व विश्वाचे दु:ख नाहीसे करतात; आणि सर्व जगाला महानंदाने दुमदुमून सोडतात. संकीर्तन भक्तीच्या माध्यमातून हे थोर महात्मे...
Read More

26 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२६ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५९ ॥*

मनाचा निग्रह करण्यासाठी 'नियम' सांगितलेले आहेत. नियमांच्या पालनाने अंत:करणाची शुद्धी होत असते, म्हणून यांना फार महत्त्व आहे. शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच नियम सांगितलेले आहेत. *'शौच'* म्हणजे शुद्धता. ही शुद्धता आतून व बाहेरून दोन्ही ठिकाणी असावी लागते. शुद्ध विचारांच्या रूपाने आतून शुद्धता, तर बाहेर  स्वच्छ व नीटनेटके राहण्याने बाह्य शुद्धता साधायची असते. दैवाने जे मिळेल...
Read More

25 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५८ ॥*

सद्गुरु श्री माउली महात्म्यांची लक्षणे सांगताना यम-नियमांचा उल्लेख करतात; म्हणून आपण त्यांची थोडक्यात माहिती घेत आहोत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत. काया, वाचा व मनाने कोणालाही शारीरिक व मानसिक पीडा न देणे ही *'अहिंसा'* होय. सद्गुरु श्री माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या...
Read More

23 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२३ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५७ ॥*

महात्म्यांच्या कृपेने आपोआप होणा-या संकीर्तन-भक्तीमध्ये, त्या साधकाकडून यम व नियम सहजगत्या पाळले जातात; असे सद्गुरु श्री माउली सांगतात. भगवान पतंजली महामुनींच्या योगसूत्रांनुसार, *अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच 'यम' आहेत; आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वरप्रणिधान हे पाच 'नियम'...
Read More

22 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *२२ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५६ ॥*

महात्म्यांच्या संकीर्तनाचे अलौकिकत्व सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "महात्म्यांच्या या कीर्तनरूप भक्तीने यमदमादिक साधने निर्बल ठरतात. मन:संयमाला कामच राहत नाही. इंद्रियांचे दमन करावेच लागत नाही." कोणतीही साधना करण्यासाठी आधी काही विशिष्ट पात्रता साधकाच्या अंगी असावी लागते. त्यात यम...
Read More

21 May 2017

॥ अमृतबोध ॥२१ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १५५ ॥

संत आपल्या अथक परमार्थसाधनेने स्वत: तर उद्धरून जातातच, पण तेवढ्यावर थांबले तर ते संत कसले? ते जनांच्या तीव्र कळवळ्याने आपल्यासोबत असंख्य दु:खी-कष्टी जीवांचाही उद्धार करतात. लोकांना बाबा-पुता करून परमार्थ समजावण्याचे हे मोठ्या कष्टाचे कामही ते निरलसपणे, निरपेक्षपणे सेवावृत्तीने करतात. त्याविषयी प्रत्यक्ष...
Read More

20 May 2017

॥ अमृतबोध ॥ २० मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १५४ ॥

॥ अमृतबोध ॥ २० मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १५४ ॥ भगवत्स्वरूप झालेल्या महात्म्यांच्याकडून होणारे अलौकिक संकीर्तनाचे महिमान स्वत: श्रीभगवंत स्वमुखाने अर्जुनाला सांगताना म्हणतात, "हे महापुरुष अत्यंत प्रेमभराने नित्य माझे नामसंकीर्तन करीत असतात आणि त्यामुळे त्यांना पापक्षलनार्थ इतर खटपटींची जरूर न राहता...
Read More

19 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१९ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५३ ॥*

श्रीभगवंत अर्जुनाला ख-या महात्म्यांची लक्षणे सविस्तर सांगत आहेत. देव म्हणतात, "ते महात्मे ज्ञानाच्या श्रेष्ठ अनुभवाला पावून, आपल्या ठायी शोभणा-या दैवी प्रकृतीला सतेजता आणून आणि सर्व जग मद्रूप जाणून, नित्य वाढत्या भक्तिभावाने सतत माझे अनुसंधान करतात." ज्ञानाची श्रेष्ठ भूमिका म्हणजे, मी भगवत्स्वरूप आहे...
Read More

18 May 2017

॥ अमृतबोध ॥१८ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १५२ ॥

महात्म्यांचे अलौकिकत्व सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "महात्म्यांच्या सर्व इंद्रियांना शांततेने भूषविलेले असते; आणि त्यांच्या विशुद्ध चित्ताने श्रीभगवंतांच्या व्यापक स्वरूपाला कायमची गवसणी घातलेली असते." साधू महात्म्यांच्या ठिकाणी शांतीचा अद्भुत विस्तार झालेला असतो. सामान्य माणूस क्रोधाविष्ट झाला की त्याचे सर्व शरीरही तसेच होते. त्या क्रोधाने त्याचे डोळे लालभडक होतात, ओठ थरथरू...
Read More

17 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१७ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५१ ॥*

महात्म्यांचे वर्तन हा एक स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महात्म्यांच्या वागण्याचे महत्त्व सांगताना म्हणतात की, "त्यांच्या सहज आचरणात नीतीला जिवंतपणा येतो !" धर्मशास्त्र हे आचरणाचे नियम आहेत. ते सर्वच्या सर्व महात्म्यांच्याच आचरणानुसार तयार झालेले आहेत. कसे वागावे व कसे वागू नये? हे महात्म्यांच्या वागण्यावरूनच ठरवले गेलेले आहे. त्यामुळे त्यांच्याच वागण्यातून खरी नीती जिवंत...
Read More

15 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१५ मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १५० ॥*

महात्म्यांची अद्भुत मनोभूमिका सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात, "आपल्या भक्तिसुखाच्या अनुभवापुढे प्रत्यक्ष मोक्षालाही तुच्छ मानीत असतात." मोक्षसुख हे जरी अपूर्व असले तरी, ज्या भक्तिसुखाचा मोह निरिच्छ, निर्मोही अशा साक्षात् श्रीभगवंतांनाही जिथे आवरत नाही, तिथे त्याच सुखाची तीव्र लालसा असणारे भक्तहृदयाचे महात्मे तरी कसे बरेे आवरू शकतील? त्यांचा जन्मच त्या भक्तिप्रेमाच्या आस्वादनासाठी...
Read More

14 May 2017

॥ अमृतबोध ॥ १४ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४९ ॥

॥ अमृतबोध ॥ १४ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४९ ॥ सद्गुरु श्री माउली महात्म्यांचे अलौकिकत्व सांगताना म्हणतात की, "हे महात्मे मोक्षाला फुटलेले कोंभच असतात. ते धैर्यगुणाचे आधारभूत स्तंभ असतात. निजानंदाने भरलेल्या समुद्रातून उचंबळून निघालेले नित्यप्रसन्न कुंभच असतात."मोक्ष हा या महात्म्यांचा सहज विस्तारच असतो. ते मोक्षरूपच झालेले असतात. धैर्य या सद्गुणाचे तेच आधारस्तंभ असतात, म्हणूनच महात्म्यांच्या...
Read More

13 May 2017

॥ अमृतबोध ॥१३ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४८ ॥

॥ अमृतबोध ॥ १३ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४८ ॥ महात्म्यांची आणखी गुणवैशिष्ट्ये सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "हे महात्मे ज्ञानगंगेत नित्य स्नान करून, परिपूर्ण अनुभवाचे नित्य भोजन करीत असतात. आणि त्यांच्या ठिकाणी आत्मसमाधान अंकुरित झाल्याप्रमाणे दिसते."लौकिक गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट...
Read More

12 May 2017

॥ अमृतबोध ॥१२ मे २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १४७ ॥

महात्म्यांची आणखी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "धर्माविषयी या महात्म्यांना पूर्ण आस्था असते आणि त्यांचे मन नेहमीच सद्सद्-विवेकाचे पोषण करीत असते." धर्म म्हणजे; मनुष्यजन्माला येऊन कसे वागावे? कसे वागू नये? याचे स्वानुभवी सिद्ध-महात्म्यांनी, ऋषिमुनींनी घालून दिलेले...
Read More

11 May 2017

॥ अमृतबोध ॥ ११ मे २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १४६ ॥

महात्म्यांचे दुसरे वैशिष्ट्य सद्गुरु श्री माउली सांगतात की, त्यांचे वैराग्य झोपेतही कायम असते. वैराग्य म्हणजे कोणत्याही सुखोपभोगांविषयीची अनास्था. माणूस एखाद्या गोष्टीचा वरकरणी कितीही आव आणत असला, तरी झोपेतील बेसावध क्षणी त्याचे सत्य बाहेर पडतेच. यासंबंधातली नाना फडणवीसांची अनोळखी माणसाची मातृभाषा...
Read More

10 May 2017

*॥ अमृतबोध ॥* *१० मे २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १४५ ॥*

सद्गुरु श्री माउली म्हणतात की, ज्याचे पूर्वसुकृत उदयाला येते, त्यालाच संतसंगतीची आस लागते व दैवयोगाने संतांची संगतीही लाभते. पण आता महत्त्वाचा प्रश्न येतो, खरे संत ओळखायचे कसे? कारण संत हेही दिसायला आपल्याचसारखे असतात. वागतात बोलतातही सामान्यांसारखेच. शिवाय कसलाही बडेजाव करीत नाहीत, मग त्यांना ओळखणार...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

64,049

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates