
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या पाचव्या अभंगात एक महत्त्वाचा चरण घालतात; *"गुजेवीण हित कोण सांगे ॥"* हा चरण मोठा गमतीदार आहे. एक कथा सांगून प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज याचे सुंदर विवरण करतात.
एक गृहस्थ कोणीतरी सांगितल्यावरून आपल्या मुलाला घेऊन एका श्रीगुरूंकडे आला. तो मुलगा एका खुनाच्या कटात...