प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या मातु:श्री, पू.पार्वतीदेवी देशपांडे म्हणत असत की, " एक पक्षी आहे, त्याला दोन पंख आहेत; एक पंख कापला तर तो उडू शकेल का? नाही. तसेच जीवरूपी पक्ष्याला चिदाकाशात उडण्यासाठी 'योगरहस्य' व 'बोधरहस्य' असे दोन पंख आहेत! "
ज्ञान तर हवेच, पण त्याचबरोबर साधनाही व्हायला हवी, तरच पूर्ण अनुभूती येते. म्हणूनच श्री माउली, साधकांनी व्यर्थ कथांमध्ये चुकूनही रमू नये, असे आवर्जून बजावतात.
'व्यर्थ कथा' या संदर्भाने श्रीज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातल्या एका विशेष ओवीचा पू.मामा येथे उल्लेख करतात. श्री माउली म्हणतात की, मोराच्या पिसा-यातील प्रत्येक पिसावर डोळा असतो. पण जर त्याचे खरे डोळे जाऊन त्याला अंधत्व आले; तर त्या इतर डोळ्यांचा ज्याप्रमाणे काहीही उपयोग होत नाही, त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून बाकी सर्व शास्त्रज्ञान व्यर्थ आहे. यासाठीच परमार्थात स्वानुभवाला जेवढे महत्त्व दिलेले आहे, तेवढे इतर कशालाच नाही. पण दुर्दैवाने लोक नुसत्या वरवरच्या गप्पांमध्येच जास्त रमतात, परंतु अतिशय महत्त्वाच्या असलेल्या साधनेचा मात्र कंटाळा करतात. या सर्वसामान्यांच्या सवयीचा विचार करूनच माउली सांगतात की, साधकांनी व्यर्थ गोष्टींमध्ये गुंतूच नये, तो बहिर्मुख मार्ग पुरता सोडून द्यावा व आपली साधनाच प्राणपणाने करावी; तरच श्रीअनंतांचा लाभ होईल !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 January 2017
॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ) ...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
January
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥
- ॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.ग...
- ॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३० ॥
- ॥ अमृतबोध ॥१४ जानेवारी २०१७ - मकरसंक्रमणाच्या हार्...
- ॥ अमृतबोध ॥ १३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ १२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २३ ॥
- ॥ अमृतबोध ॥७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - २२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २०॥
- ॥ अमृतबोध ॥४ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १६ ॥
-
▼
January
(31)
0 comments:
Post a Comment