3 January 2017

॥ अमृतबोध ॥ ३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८ ॥

वेद म्हणजेच ज्ञान. श्रीभगवंतांचे कलावतार महर्षी व्यास यांनी अपरंपार अशा वेदसमुदायाचे चार भाग केले; ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. यजुर्वेदाचे पुन्हा दोन भाग केले, एक शुक्ल यजुर्वेद व दुसरा कृष्ण यजुर्वेद. शिवाय प्रत्येक वेदाचे पुन्हा दोन भाग, मंत्र व ब्राह्मण. वेदांतून कर्म, उपासना व ज्ञान असे हे तीन भगवत्प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत.
या प्रचंड ज्ञानसागराच्या संदर्भात प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींचे एक प्रमाण देतात. माउली म्हणतात, " देवा, तुझे वाक्य म्हणजेच तुझ्या नि:श्वासापासून प्रकट झालेल्या वेदांचा अर्थ मूळ स्वरूपात न कळता, वरवर शब्दज्ञानाने अगर वाच्यार्थाने लावून, 'मला कळले' असे म्हणणा-याला खरेतर काहीच कळलेले नसते. कारण नुसते कळून उपयोग नाही, तर जे कळले अाहे त्याचा प्रत्यक्ष अनुभवही यायला हवा. त्यासाठी श्रीगुरुकृपाच व्हायला हवी, दुसरा मार्ग अस्तित्वातच नाही. "
चार वेदांचे ज्ञान अंगी मुरण्यासाठी, अनुभवण्यासाठी सहा शास्त्रे निर्माण करावी लागली. म्हणूनच शास्त्रांना फार महत्त्व आहे. कोणतेही कर्म हे शास्त्रांच्या डोळ्यांनी पाहिल्यावरच न्याय्य ठरते, असे माउली स्वत: म्हणतात. शास्त्रे ही डोळ्यांसारखी आहेत, अतीव आवश्यक व महत्त्वपूर्ण.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates