5 January 2017

॥ अमृतबोध ॥ ५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २०॥

भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली हे महान, अतुलनीय शब्दप्रभू आहेत. त्यांच्या करुणा-कृपेशिवाय त्यांच्या शब्दांचे मर्म चुकूनही कळत नाही. त्यांना नेमके काय म्हणायचे आहे? हे समजून घेऊनच त्यांच्या शब्दांचे अर्थ करावे लागतात. हरिपाठाच्या दुस-या अभंगातले दुसरे चरणच याचे उत्तम उदाहरण आहे. माउली म्हणतात,
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥२॥
या चरणाचा अचूक अर्थ सांगताना पू.मामासाहेब देशपांडे महाराज काय म्हणतात पाहा. माउली म्हणताहेत, नवनीत मंथून घ्या. नवनीत म्हणजे लोणी. एखादी सुगरण जर लोणी घेऊन घुसळण्याचा प्रयत्न करू लागली, तर तिला 'सुगरण' न म्हणता 'कुगरण'च म्हणावे लागेल. येथे शब्दार्थाने जाऊन चालत नाही. दही मंथन करून लोणी घ्यावे, असेच माउलींना येथे म्हणायचे आहे. वेद, उपनिषदे, शास्त्रे व पुराणांमधील पाल्हाळ वाटणारा कथाभाग सोडून त्यातील मुख्य जे तत्त्व तेच तुम्ही स्वीकारा;  हरिभक्तीचाच भाग आधी जाणून आपलासा करा, हेच माउलींना या उपमेतून अभिप्रेत आहे. या पद्धतीने गेले तरच श्रीहरी हाती लागतील.
पण एवढेसेच सांगतील तर ते माउली कसले? माउलींच्या एकेका शब्दांत गूढार्थाचे ब्रह्मांड सामावलेले असते; आणि त्यातील त्यांचे ते निगूढ अभिप्राय पू.मामाच नेहमी चपखलपणे आपल्यासमोर ठेवत असतात. माउलींच्या या अभंग चरणाचा गाभा नीट समजून घ्यायचा असेल, तर आधी लोणी मिळवण्याची पद्धत पार विरजण लावण्यापासूनच बघायला हवी. म्हणून पू.मामा त्याचेही सविस्तर विवरण करतात, ते उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:

Post a Comment

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Blog Archive

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates