सद्गुरु श्री माउलींच्या हरिपाठाच्या तिस-या अभंगातील सगुण-निर्गुण विचाराचा समारोप, प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज अत्यंत सुंदर व महत्त्वपूर्ण शब्दांमध्ये करतात. ही सर्व वाक्ये नेहमी चिंतनात ठेवावीत इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
पू.मामा सांगतात, "एकदम निर्गुणाचा अनुभव येणे अशक्य असल्यामुळे, सगुण आणि निर्गुण एकच आहे अशी शुद्ध भावना ठेवूनच त्याप्रमाणे भक्ताने वर्तन करावे. परमात्म्यापासून उत्पन्न होणा-या सगुण रूपासच 'भगवती शक्ती' असे म्हणतात व तिच्या आधारानेच जीवाला मुक्ती मिळते; म्हणून तिलाच 'भक्ती' असेही म्हणतात.
प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती(टेंब्ये) स्वामी महाराजांनीही याविषयी सुंदर सांगितले आहे. ते म्हणतात, "सगुणाची उपासना करून मनुष्याने कृतार्थ व्हावे; कारण त्याशिवाय निर्गुणाची अनुभूती येणार नाही. राजाला जसा आपल्या शिक्कामोर्तबाचा व कायद्याचा अभिमान असतो, तसा देवाला आपल्या सगुण रूपाचा व वेदशास्त्रांचा अभिमान असतो. शिक्कामोर्तब किंवा कायदा म्हणजे राजा नाही हे खरे; पण त्याशिवाय त्याचा व्यवहार होत नाही; हेही तितकेच खरे !"
म्हणून सगुण-निर्गुणाच्या नुसत्या चर्चेपेक्षा, सगुणाची भक्ती करून त्यातून प्रकट होणा-या निर्गुणाची प्रचिती घेण्यातच आपले खरे हित आहे.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
30 January 2017
॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
January
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥
- ॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.ग...
- ॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३० ॥
- ॥ अमृतबोध ॥१४ जानेवारी २०१७ - मकरसंक्रमणाच्या हार्...
- ॥ अमृतबोध ॥ १३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ १२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २३ ॥
- ॥ अमृतबोध ॥७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - २२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २०॥
- ॥ अमृतबोध ॥४ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १६ ॥
-
▼
January
(31)
0 comments:
Post a Comment