सद्गुरु श्री माउली या अभंगातून त्रिगुण असार असून त्यांचे अधिष्ठान असणारे परमात्मतत्त्वच सार आहे असे सांगतात. प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांनी माउलींना अभिप्रेत असणारी त्रिगुणांची असारता, माउलींच्याच ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधाराने मोजक्या पण फार मार्मिक शब्दांत मांडलेली आहे. तो भाग आपण नीट समजून घेतला पाहिजे.
ते म्हणतात की, सत्त्वगुण उत्तम आहे, रजोगुण मध्यम आहे आणि तिसरा तमोगुण हा त्यांच्याच आधाराने आलेला अधमगुण आहे. श्रीभगवंतांची मायाशक्ती हीच 'प्रकृती' आहे व तीच या तिन्ही गुणांचे जन्मस्थान आहे. एकाच शरीरावर बाल, तरुण व वृद्ध या तीन अवस्था जशा प्रकट होतात, तसे एकाच वृत्तीवर हे तीन गुण परिणाम पावतात. सोन्यात जसे हिणकस अधिक मिसळले की वजन वाढते, पण कस कमी होतो किंवा पूर्ण जागृतीतच आळस भरत चालला म्हणजे हळूहळू सावधपणा कमी कमी होत जाऊन झोपेत त्याचा पूर्ण लोप होतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर निघालेली वृत्ती सत्त्व व रजाद्वारे पूर्ण तमोरूप बनते.
हे तिन्ही गुणच जीवाला विविध बंधनांमध्ये अडकवत असतात. ते कसे बंधनात पाडतात हे उद्या पाहू.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
17 January 2017
॥ अमृतबोध ॥ १७ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३२ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
January
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥
- ॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.ग...
- ॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३० ॥
- ॥ अमृतबोध ॥१४ जानेवारी २०१७ - मकरसंक्रमणाच्या हार्...
- ॥ अमृतबोध ॥ १३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ १२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २३ ॥
- ॥ अमृतबोध ॥७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - २२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २०॥
- ॥ अमृतबोध ॥४ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १६ ॥
-
▼
January
(31)
0 comments:
Post a Comment