हरिपाठाच्या दुस-या अभंगातून सद्गुरु श्री माउली खूप महत्त्वाचा विषय मांडतात, साधकांना फार मोलाचा उपदेश करतात.
आपले मन ही फार भयंकर गोष्ट आहे. ते केव्हा काय करेल याचा नेम नाही. म्हणून साधकांनी या मनाच्या चुकूनही आहारी जाता कामा नये. साधना सुरू झाली की काही सिद्धी मिळतात. त्यात जर आपल्या मनाने गोडी घेतली तर साधना संपलीच म्हणून समजावे. पार वाटोळे होईपर्यंत त्या साधकाला योग्यायोग्य काही उमजतच नाही.
यासाठीच पू.मामासाहेब देशपांडे महाराज सद्गुरु श्री माउलींच्या, 'वांया तूं दुर्गमा न घाली मन ।' या चरणाचा अर्थ करताना म्हणतात, "साधक निरनिराळ्या प्रकारांनी, सिद्धी प्राप्त होईल या विचाराने, कठीणतम साधना करतो; पण मूळ विसरतो. तसे तू करू नकोस. कारण श्रीहरींकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे; तो म्हणजे 'सुषुुम्नामार्ग', पाठीचा किंवा 'पश्चिममार्ग' होय. या मार्गाची ओळख केवळ सद्गुरूच करवून देऊ शकतात. म्हणून त्यांच्याकडून ते सुषुम्नाद्वार मोकळे करून घेऊन, ते करून देणा-या श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना कर. नाहीतर तुझे मन तुला केव्हा खड्ड्यात घालील याचा नेम नाही! "
खरा परमार्थ घडण्यासाठी अनिश्चिततेने, अशाश्वताने भरलेल्या मनाच्या प्रांतातून म्हणजेच प्रपंचातून आपले सुनिश्चित, सुनियोजित व शाश्वत अशा साधनेच्या प्रांतात संक्रमण होणे अगत्याचे आहे; आणि त्यासाठीच श्रीगुरुकृपेची नितांत आवश्यकता असते. एवढेच नाही तर, कृपा झाल्यावर त्या शुद्ध होत जाणा-या मनापासून व प्रेमाने साधना करण्याचीही गरज असते. भगवान सूर्यनारायणांच्या कर्कवृत्तातून मकरवृत्तात होणा-या संक्रमणाचा जसा आपण आनंदोत्सव साजरा करतो; तसेच प्रपंचातून परमार्थात होणा-या आपल्या या दिव्य 'आध्यात्मिक' संक्रमणाच्या आनंदोत्सवानिमित्त, 'अमृतबोध'च्या सर्व वाचक-सुहृदांना 'सद्गुरुबोध' परिवाराकडून प्रेमादरपूर्वक शुभेच्छा !!
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment