सद्गुरु श्री माउली सांगतात की, सगळ्या व्यर्थ कथा सोडून एकनिष्ठपणे साधना करावी. त्याचाच अधिक खुलासा ते अभंगाच्या तिस-या चरणात करतात.
एक हरि आत्मा जीव शिव समा ।
वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥
पू.मामा या चरणाचा खूप सुंदर अर्थ सांगतात की, वेदांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून, 'एक परमात्माच सत्य आहे, बाकी सर्व क्षणभंगुर व अनित्य आहे व मी परमात्म्याचाच अंश आहे', असे शब्दज्ञान आधी करून घेऊन, नंतर त्याचा अनुभव येण्यासाठी इतर ठिकाणी व्यर्थ मन न घालता, श्रीगुरूंनी दिलेली साधना न चुकता केली पाहिजे!
हरि, आत्मा, जीव, शिव हे सर्व एकच तत्त्व आहे, हे दृढपणे चित्तात ठसवून, इतर फापटपसा-यांमध्ये, सिद्धींमध्ये मन गुंतू न देता, खरा अनुभव येण्यासाठी श्रीगुरूंनी दिलेली साधनाच केली पाहिजे. आधी शब्दज्ञान तरी झाले पाहिजे, मगच त्याचा अनुभव आपणही घ्यावा, अशी तीव्र इच्छा निर्माण होईल ना? म्हणून याच क्रमाने जावे लागते.
सर्व संतांचे हेच सांगणे अाहे. श्रीसंत कबीरजी म्हणतात, 'सुमिरन सुरत लगाय कर, मुख ते कछु न बोल । बाहर के पट देय कर, अंतरके पट खोल ॥' बाहेरचा सर्व संसर्ग सोडून, अंतर्मुख होऊन साधना केल्यासच परमात्म्याच्या एकरूपतेचा अनुभव येतो ! त्यासाठी श्रीगुरूंनी दिलेली साधना, जशी सांगितली आहे तशीच प्रेमाने व नेमाने करणे, हाच एकमेव मार्ग आहे. याशिवाय अन्य सर्व मार्ग हे दुर्गम आहेत, म्हणून त्यांच्या नादी लागू नये; असेच श्री माउली येथे कळकळीने सांगत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
13 January 2017
॥ अमृतबोध ॥ १३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २८ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
January
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥
- ॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.ग...
- ॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३० ॥
- ॥ अमृतबोध ॥१४ जानेवारी २०१७ - मकरसंक्रमणाच्या हार्...
- ॥ अमृतबोध ॥ १३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ १२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २३ ॥
- ॥ अमृतबोध ॥७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - २२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २०॥
- ॥ अमृतबोध ॥४ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १६ ॥
-
▼
January
(31)
0 comments:
Post a Comment