सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या दुस-या अभंगातून मंथनाची गूढ प्रक्रिया सांगतात. पण त्यासोबत काय करू नये? हेही सांगतात की, 'वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥'
प.पू.श्री.मामा नेहमी म्हणत की, " माउलींच्या शब्दांचे अर्थ त्यांच्याच वाङ्मयाच्या आधारे लावावेत." माउलींच्या वाङ्मयाच्या सखोल अभ्यासासाठी पुरेपूर संदर्भही त्यांच्याच वाङ्मयात मिळतात व तेच सर्वात उत्तम ठरतात.
सद्गुरु श्री माउलींच्या या चरणावर पू.मामा दोन प्रश्न उपस्थित करतात; आता कथा कोणत्या? त्यांतील व्यर्थ व वाया कोणत्या? या प्रश्नांचे समर्पक उत्तर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात सांगून ठेवलेले आहे, अशी पुष्टीही लगेच जोडतात.
मोठा गाढा विद्वान आहे, कोणते शास्त्र त्याला माहीत नाही असे नाही. पण अध्यात्माचा विषय आला की, पाल अंगावर पडल्यासारखा तो त्वरित झटकून टाकतो. परमार्थाची थट्टा करतो. योगशास्त्राचे त्याचे वावडेच अाहे. उपनिषदांचे नाव काढले की तो पाठमोरा होतो. असल्या पांडित्याचा काय उपयोग? हे असले निव्वळ शब्दज्ञान विषयलोभी मनाला शुद्ध करू शकत नाही; तिथे श्रीगुरुकृपेने होणारी प्रेमयुक्त साधनाच उपयोगी पडते ! परमात्म्याच्या प्रेमभक्तीवीण इतर सर्व गोष्टी या व्यर्थ, वायाच आहेत. नुसते पांडित्य किंवा शब्दज्ञान उपयोगाचे नाही; त्याप्रमाणे अनुभूती पण असावी लागते. म्हणूनच प.प.श्री.टेंब्येस्वामी महाराजांनी साधकांसाठी 'योगरहस्य' व 'बोधरहस्य' अशी दोन प्रकरणे रचलेली आहेत !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
10 January 2017
॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
January
(31)
- ॥ अमृतबोध ॥ ३१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४३ ॥
- ॥ अमृतबोध ॥२७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ४२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ४० ॥
- ॥ अमृतबोध ॥ २४ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ २२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २१ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २० जानेवारी २०१७ प.पू.सद्गुरु श्री.ग...
- ॥ अमृतबोध ॥ १९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३३ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १७ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ३० ॥
- ॥ अमृतबोध ॥१४ जानेवारी २०१७ - मकरसंक्रमणाच्या हार्...
- ॥ अमृतबोध ॥ १३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ...
- ॥ अमृतबोध ॥ १२ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ११ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १० जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २५ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ९ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २४ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ८ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २३ ॥
- ॥ अमृतबोध ॥७ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - २२ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ६ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २१ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ५ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - २०॥
- ॥ अमृतबोध ॥४ जानेवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १९ ॥
- ॥ अमृतबोध ॥ ३ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १८ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७ ॥
- ॥ अमृतबोध ॥ १ जानेवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १६ ॥
-
▼
January
(31)
0 comments:
Post a Comment