ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातून लोणी काढून घेतात, त्याप्रमाणे अनंतास म्हणजे श्रीभगवंतांना घ्यायचे असते, असे सद्गुरु श्री माउली सांगतात.
श्रीभगवंत तर भावाचे भुकेले असतात. ते भक्ताचा तीव्र व अनन्य प्रेमभाव तपासून पाहतात आणि मगच पूर्णकृपा करतात. यासाठी प.पू.श्री. मामासाहेब देशपांडे महाराज स्वत:च्या मातु:श्रींचेच उदाहरण देतात. पू.मामांच्या मातु:श्री पू.पार्वतीदेवी देशपांडे या हरिरंगी रंगलेल्या थोर भगवद्भक्त होत्या. साक्षात् श्रीकृष्ण भगवंत त्यांच्या सतत अवतीभोवती असत, त्यांच्याशी दुपारच्या फावल्या वेळात श्लोकांच्या भेंड्या देखील खेळत असत. त्यांचा परमार्थ-अधिकार मोठा अजबच होता.
पू.मामा सांगतात, " माझी आई हा दही घुसळण्याचा प्रयोग इतक्या तन्मयतेने करायची की विचारू नका. घुसळण पूर्ण झाल्यावर, आई प्रथम थोडे लोणी घुसळखांब्याला लावायची व हात जोडून भगवान गोपालकृष्णांची प्रार्थना करायची. आश्चर्य म्हणजे; ते लोणी अदृश्य व्हायचे! मी चिकित्सकबुद्धीने अनेक वेळा पाहिले, तर मला असे अाढळून आले की, एखाद्या मुलाने बोटांनी लोणी काढून घेतल्यास बोटांचे ठसे उठतील तसे; किंवा जिभेने चाटल्यावर उठतील तसे ठसे खांब्यावर दिसत असत.
बरे; आमच्या घरातील इतरांनी, आमच्या बहिणी-भावजयांनी तसा प्रयोग केला तर ते लोणी आम्हीच पळवत असू. यावरून 'देव भावाचा भुकेला आहे' हे दिसते. असा भाव फक्त आईजवळच होता, म्हणून तिने प्रेमाने घुसळून काढलेले लोणी देव स्वत: येऊन खात असत.
याविषयी मीच एकदा तिला विचारले. तेव्हा तिने उत्तरादाखल 'तैसे घे अनंता ।' मधील खुबी मला सांगितली. सद्गुरु श्री माउलींनाही येथे अभिप्रेत असणारा तोच खरा रहस्याचा भाग आहे."
नवनीत मिळवण्याच्या प्रक्रियेचा पू.मामा सांगत तो गूढार्थ आपण उद्याच्या 'अमृतबोध' मधून जाणून घेऊया.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment