सगुण व निर्गुणाचा श्रीसंत एकनाथ महाराज आपल्या भागवतात सुरेख समन्वय करतात. श्रीभगवंतांच्या तोंडी त्यांनी ओवी घातलेली आहे की, माझे निर्गुण निजस्वरूप किंवा वैकुंठातील शेषशायी सगुणरूप दोन्हीही एकरूपच होत." देवांच्या ठायी सगुण-निर्गुण असा खरोखरी भेदच नाही. म्हणून माउली देखील सांगतात, विटेवर उभे असलेले हे सनातन परब्रह्मच 'सगुणनिर्गुण-विलक्षण' आहे !
प.पू.मामांनी एकदा या संबंधी मातु:श्री पू.पार्वतीदेवींना विचारले. त्यावर त्यांनी श्रीगुरुचरित्रातील शबराच्या आख्यानाची कथा सांगितली. या दोन्हींचा संबंध काय? हे पटकन् कळणार नाही, पण नीट विचार केला म्हणजे पू.मातु:श्रींची भूमिका लक्षात येते. शबराच्या मनात शिवपूजा करण्याचा विचार येतो. तो भग्न झालेले एक लिंग उचलून घेऊन येतो. त्याची पूर्वपुण्याई चांगली असल्याने त्याच्यावर गुरुकृपा होते. गुरु त्याला योग्य ज्ञान देतात, ते भग्नलिंग सोडून दुसरे लिंग घेण्याचा उपदेश करतात. तो गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, दररोज ताज्या चिताभस्माने मनोभावे शिवपूजा सुरू करतो. एकेदिवशी चिताभस्म न मिळाल्याने त्याला आपल्या पत्नीस जाळून तिच्या भस्माने पूजा पूर्ण करावी लागते. प्रसाद घ्यायला तो सवयीने हाक मारतो, तर त्याची बायको धावत येते. त्याला कळतच नाही हे कसे घडले. तेवढ्यात त्या दोघांच्या या अनन्यभक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात् भगवान शिव देखील प्रकट होऊन त्यांना दर्शन देतात. म्हणजेच त्यांना सगुणाची अनुभूती येते. पू.मातु:श्री या कथेचे तात्पर्य सांगतात की, निर्गुणातून सगुण प्रकट होण्यासाठी ख-या भक्तीची आवश्यकता असते; आणि ही भक्ती केवळ श्रीगुरुकृपेनेच प्रकट होत असते !
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment