चार वेदांचा सखोल अभ्यास व्हावा म्हणून सहा शास्त्रे निर्माण केली गेली. या सहा शास्त्रांच्या तीन जोड्या आहेत. प्रत्येक जोडीतील दोघांमध्ये थोडे मिळते-जुळते आहे; सामंजस्य आहे. पहिल्या जोडीत 'न्याय' व 'वैशेषिक' ही दोन शास्त्रे येतात. ही दोन्ही 'ईश्वर व पृथ्वी आदी पंचमहाभूतांचे परमाणू जगताला कारण आहेत', असे मानतात.
दुसरी जोडी 'सांख्य' व 'योग' या दोन शास्त्रांची आहे. सांख्य प्रकृतीला जगताचे कारण मानतात. योगशास्त्र मात्र प्रात्यक्षिक व अनुभूतीवर भर देऊन प्रयत्नांचा पुरस्कार करते. त्यामुळे त्याला ईश्वराचा अनुभव आला. म्हणून योगवादी ईश्वर व प्रकृती ही दोन कारणे मानतात.
तिसरी जोडी आहे 'पूर्वमीमांसा' व 'उत्तरमीमांसा' या दोन शास्त्रांची. पूर्वमीमांसा धर्माला तर उत्तरमीमांसा परमेश्वरालाच कारण मानते.
जसा एखादा पांगळा माणूस इतरांच्या मदतीशिवाय प्रवास करू शकत नाही, तसे ह्या शास्त्रांच्या अभ्यासाशिवाय वेदांचे ज्ञान होत नाही.
असा अभ्यास ज्यांनी ज्यांनी केला व त्याप्रमाणे जे राजर्षी, ब्रह्मर्षी वागले; त्यांचा कथारूप इतिहास व त्यांचा उपदेश ज्यात संकलित केलेला आढळतो त्यांना 'पुराणे' म्हणतात. या पुराणांमध्ये अठरा मुख्य आहेत.
या सर्व ग्रंथांचा श्रीगुरुकृपेच्या अधिष्ठानाखाली डोळस अभ्यास केला असता लक्षात येते की, यांचा समन्वय केवळ श्रीभगवंतांपाशीच होतो. म्हणून प.पू.मामा म्हणतात, " उपनिषदांतील अथवा वेदांतील ज्ञान, उपासनामार्गातील प्रत्यक्ष अनुभूतीचे ज्ञान; व पुराणांतील उपदेशपर ज्ञान; हे सर्व त्या परमेश्वर-प्राप्तीकरिताच आहे. "
या एवढ्या प्रचंड पसा-यातून परमेश्वराची अनुभूती कशी घेतात? हे श्री माउली अभंगाच्या
दुस-या चरणात सांगतात.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment